परतीचे मेघ...


परतीचे मेघ...

उंच टांगलेला आकाशकंदील काढताना...
विझलेल्या पणत्या आवरताना..
किल्ल्यावरील चित्रे खोक्यात ठेवताना...
किल्ला पाडून कोपरा साफ करताना...
फराळाच्या डब्याच्या तळाशी असलेलं चिवड्याचं भुस्कट तोंडात टाकताना...
व्हॉटस् अप मधील शुभेच्छा डिलीट करताना...
दिवाळी अंकातील आरोग्य विषयी लेख वाचताना...
प्रवासी बॅगा भरून माणसे घराकडे परत चाललेली पहाताना...
नातवंडे आपापल्या घरी निघालेली पाहून, आज्या डोळे पुसताना...
आणि
उद्यापासून कामावर रुजू व्हायचंय या कल्पनेने वैतागलेले चेहरे पहाताना....

*दिवाळी म्हणजे नक्की काय... हे समजतं!*

- Source : Whatsapp Forward
- Author : Unknown ...

Comments