'राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास' डाॅ.सचिन जांभोरकर,
'राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास' डाॅ.सचिन जांभोरकर, नागपूर माझ्या मागच्या लेखाला ('आपले राष्ट्रपुरुष कोण?') सहर्ष स्वीकारल्याबद्दल धन्यवाद !आपली राष्ट्रीय जीवनमूल्ये, राष्ट्रीय आदर्श व राष्ट्रपुरुष कोण असावेत, या संकल्पनांच्या स्पष्टतेनंतर आता आपणां सगळ्या भारतीयांना जिजाऊमांसाहेब, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, भगिनी निवेदिता, सावित्रीबाई फुले, राणी मां गाईडिन्ल्यू आदि प्रातःस्मरणीय मातृदेवतांइतकीच वंदनीय व पूजनीय असणारी; देव, देश अन् धर्मरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहूति देवून बलिदानाचा अत्युच्च आदर्श प्रस्थापित करणारी चित्तोडची महाराणी पद्मिनी (पद्मावती) हिचा नेमका इतिहास काय आहे, हे कळावे या हेतूने हा लेखनप्रपंच. राणी पद्मिनी व तिच्या समवेत चित्तोडगडावरीवर बलिवेदीवर जोहार करणाऱ्या सोळा सहस्त्र राजपूत माता-भगिनींच्या सर्वोच्च बलिदानाचा इतिहास पूर्णपणे माहित करुन मगच सर्वांनी संजय लीला भन्साळीचा 'पद्मावती' पहावा, ही नम्र अपेक्षा. सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका व सासरा असणाऱ्या आणि दिल्लीच्या गाद...